विनोद कांबळीने भरला उमेदवारीचा अर्ज

September 24, 2009 11:22 AM0 commentsViews: 7

24 सप्टेंबर विनोद कांबळीने गुरूवारी तिसर्‍या आघाडीकडून कांजूरमार्ग विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी तिसर्‍या आघाडीचे नेते रामदास आठवले आणि कपिल पाटील उपस्थित होते. अर्ज दाखल करण्यापूर्वी विनोद कांबळीनं लोकलमधून सायन ते कांजूरमार्ग प्रवास केला. त्यानंतर वडिलांना भेटण्यासाठी तो रिक्षातून घरी गेला. मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड, तसेचं डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न महत्वाचा असल्याचं तसंच शिक्षणाच्या क्षेत्रात काम करायचं असंल्याचं त्याने यावेळी सांगितलं.

close