मुस्लीम आरक्षण रद्द, राज्य सरकारने काढला जीआर

March 4, 2015 8:04 PM4 commentsViews:

muslim arakshan44404 मार्च : अगोदरच मराठा आणि मुस्लीम आरक्षणाला हायकोर्टाने रेड सिग्नल दिलाय आता राज्य सरकारनेही मुस्लीम आरक्षण रद्द केलंय. मुस्लीम आरक्षण रद्द करण्याचा सरकारनं जीआर काढलाय. मुस्लिमांना शिक्षणातही पाच टक्के आरक्षणाचा निर्णय रद्द करण्यात आलाय.

गेल्या वर्षी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं मुस्लीम समुदायाला शिक्षण आणि नोकरीत 5 टक्के आरक्षण लागू करण्याची अधिसूचना काढली होती. पण मुंबई हायकोर्टाने मुस्लिमांचं शिक्षणातलं 5 टक्के आरक्षण वैध ठरवतानाच नोकरीतलं 5 टक्के आरक्षण मात्र रद्द केलं होतं. अधिसूचनेच्या 6 महिन्याच्या आत विधिमंडळात कायदा करणं गरजेचं होतं. मात्र, नव्या भाजप सरकारनं मुदतीच्या आत कायदा केला नाही आणि नवी अधिसूचनाही काढली नाही. अशाप्रकारे जुनी अधिसूचना कालबाह्य झाली. पण सरकारचा निर्णय मात्र सरकारी व्यवहारात कायम राहिला. आता मंगळवारी राज्य सरकारनं जीआर काढून मुस्लिमांचं आरक्षण रद्द केलंय. त्यामुळे अधिसूचनेला अधीन राहून गेल्या शैक्षणिक क्षेत्रात ज्या मुस्लीम विद्यार्थ्यांना शिक्षणात आरक्षणाचा फायदा मिळाला असेल तोदेखील आता हिरावून घेतला जाण्याची शक्यता आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे येतं शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी राज्य सरकार मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत काही पावलं उचलणार आहे की नाही, याविषयी कमालीची संदिग्धता निर्माण झालीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Aditya

  बीजेपी आलीय नंतर हे अपिक्षा होतीच, चागंला झला

 • Luis Shelke

  ‘मत’ लबी सरकारचा आणखी एक मतलबी निर्णय.

 • tanwan locio

  भाजपा को आपनी सोच बदलनी होगी। …….
  मुस्लिम पर ये अन्याय ही होगा
  अब आरक्षण नहीं मिला तो स्टूडेंट पड़ कैसे पाएंगे। …..

 • Mohammad Aftab

  बी जे पी ने अब शुरू की जातिवाद की राजनीती, कौन कहता है सब का साथ सब का विकास.

close