‘आप’च्या राजकीय व्यवहार समितीमधून यादव-भूषण यांची हकालपट्टी

March 4, 2015 8:39 PM0 commentsViews:

prashant bhushan and yadav04 मार्च : आम आदमी पार्टीमध्ये आज घडामोडींना वेग आला. अखेर आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची आम आदमी पक्षाच्या ‘पॉलिटीकल अफेअर्स कमिटी’ म्हणजेच राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी करण्यात आलीये. मात्र, त्यांचं पक्षाचं सदस्यत्व कायम ठेवण्यात आलंय.

आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज (बुधवारी) 6 तास दिल्लीत बैठक चालली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. पीएसी हे आपमधलं निर्णय घेणारं सर्वात महत्त्वाचं व्यासपीठ आहे. या मुद्द्यावरून कार्यकारिणीमध्ये मतदान घेण्यात आलं. त्यात 11 मतं यादव आणि भूषण यांच्याविरोधात तर 8 मतं त्यांच्या बाजूनी पडली. योगेंद्र यादव यांना पक्षाच्या प्रवक्तेपदावरूनही दूर करण्यात आलंय. मात्र, पक्षाचे संयोजक म्हणून राजीनामा देण्याचा अरविंद केजरीवाल यांचा प्रस्ताव नाकारण्यात आलाय. केजरीवाल यांनी एकाच वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अशा दोन पदांवर राहू नये अशी सूचना योगेंद्र यादव यांनी केली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close