युवराज सिंग दुखापतग्रस्त

September 24, 2009 11:26 AM0 commentsViews: 105

24 सप्टेंबर भारताचा धडाकेबाज बॅटसमन युवराज सिंग दुखापतग्रस्त झाला आहे. फिल्डिंगचा सराव करताना युवराजच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली. त्यामुळे तो सराव करण्यासाठी मैदानावर उतरु शकला नाही. युवराजची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याने त्याला किमान सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय. आता युवराजच्या जागी विराट कोहलीचा भारतीय टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. भारताची पहिली मॅच येत्या 26 तारखेला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी रंगणार आहे.

close