सॅमसंगचा ‘गॅलेक्सी एस-6′ आणि ‘एस-6 एज’ लाँच

March 5, 2015 10:45 AM0 commentsViews:

05 मार्च : स्मार्टफोनची बॅटरी सतत संपल्यामुळे हैराण होणार्‍या मंडळींसाठी एक खूशखबर आहे. फक्त दहा मिनिटांत चार्ज होणारा आणि सुमारे दहा तास चालणारा स्मार्टफोन बाजारात आला आहे. स्मार्टफोनच्या जगतातील आघाडीचे नाव असलेल्या सॅमसंग कंपनीने ‘गॅलेक्सी एस-6स आणि गॅलेक्सी एस-6 एज हे दोन स्मार्टफोन नुकतीच लाँच केले आहेत. वायरलेस चार्जिंगची सुविधा असलेल्या या स्मार्टफोनमध्ये अत्यंत अत्याधुनिक अशी फिचर्स असून, हे फोन फक्त दहा मिनिटांत चार्ज होतात आणि किमान 10 तासांपर्यंत चालतात, असा दावा सॅमसंगने केला आहे. दोन्ही स्मार्टफोन मेटल प्रेम आणि ग्लास बॉडीचे असून, हे स्मार्टफोन ग्राहकांच्या नक्कीच पसंतीस उतरतील, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

सॅमसंग ‘गॅलेक्सी एस-6’ची फिचर्स

-आतापर्यंतचा सर्वात स्लिम स्मार्टफोन, 5.1 इंच HD सुपर अमोलेड डिस्प्ले, 2560 -1440 स्क्रीन रेझ्युलेशन, 6.8 MM जाडी, वेगवान चार्जिंग तंत्रज्ञानासह 2550 Mah बॅटरी

सॅमसंग ‘गॅलेक्सी एस-6 एस’ची फिचर्स

– 5.1 इंच HD सुपर आमोलेड डिस्प्ले, दोन्ही बाजूला डिस्प्ले स्क्रीन, स्क्रीन गोरिल्ला ग्लास 3चे प्रोटेक्शन, वेगवान चार्जिंग तंत्रज्ञानासह 2600 Mahची बॅटरी.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close