नाराज सदा सरवणकरांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

September 24, 2009 12:59 PM0 commentsViews: 7

24 सप्टेंबर शिवसेनेचे दादरचे आमदार सदा सरवणकर यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. त्यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेनं तिकिट नाकारलं होतं. त्यामुळे ते नाराज होते. त्यांनी मातोश्रीवर जाऊन शक्ती प्रर्दशनही केलं होतं . त्यानंतर सरवरणकरांच्या कार्यकर्त्यांनी मनोहर जोशींच्या घरावर दगडफेकही केली होती. माहीम मधून शिवसेनेनं आदेश बांदेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सरवणकरांशी राणेंनी संपर्क साधला. माहिममधून उमेदवारी देण्याची त्यांना लालूच दाखवली. त्यामुळे शिवसेनेचा आमदार काँग्रेसने पळवला आणि हे ऑपरेशन केलं ते काँग्रेस नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी.

close