शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द

September 24, 2009 1:04 PM0 commentsViews: 51

24 सप्टेंबर शिवसेनेनं आपला दसरा मेळावा रद्द केला आहे. त्याऐवजी शिवसेना आणि भाजपचा संयुक्त मेळावा होणार आहे. दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी मोठं आकर्षण असतं. पूर्वी अनेकजण बाळासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी शिवाजीपार्कवर दसरा मेळाव्यासाठी जमत. यंदा दसरा मेळावा रद्द होण्याचं हे तिसरं वर्ष आहे. आता शिवाजीपार्कवर दसरा मेळाव्याऐवजी युतीची संयुक्त जाहीरसभा घेतली जाणार आहे.

close