अवकाळी पावसानंतर राज्यात गारपिटीचा इशारा

March 5, 2015 12:55 PM0 commentsViews:

rain farms

05 मार्च : राज्यात ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी गारांच्या पाऊसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. येत्या रविवारी 8 मार्च रोजी मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकर्‍यांना पुन्हा एकदा गारपीटीचा सामना करावा लगणार असल्याची शक्याता वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यातला शेतकरी आधीच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा ताळेबंद लावत असतानाच हे आणखी एक गारपिटीचं संकट दाराशी येऊन उभं राहिलं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढलं होतं. यात विदर्भातील संत्रा, गहू, हरभरा, मराठवाड्यात डाळिंब, ज्वारी, भूईमूग तर कोकणात आंबा आणि काजू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यात पुन्हा गारपीटीच्या इशार्‍यामुळे शेतकर्‍याच्या उरलेली आशाही धुळीला मिळण्याची चिन्हे आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close