‘आरे वाचवा’ साठी राज ठाकरेंचं कुटुंब मैदानात !

March 5, 2015 6:33 PM0 commentsViews:

aare vachav sharmil thakcary405 मार्च : आरे कॉलनीतील झाडं वाचावी म्हणून आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कुटुंब मैदानात उतरलंय. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी आरे कॉलनीत झाडं वाचावी म्हणून शांततापूर्ण आंदोलन केलं.

इतकंच नाही तर शर्मिला ठाकरे यांनी मेट्रो तीनच्या कारशेडच्या जागेत वृक्षारोपणकरुन या कारशेडला विरोध केलाय. अमित ठाकरे आणि शर्मिला यांनी मेट्रोच्या अधिकार्‍यांनी तोडलेल्या झाडांची पाहणी केली.

मेट्रोचं कारशेड तयार करण्यासाठी मुंबईत अनेक जागा आहेत. मग, याच जागेचा अट्टहास का ?, असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close