…म्हणून ‘निर्भया’डॉक्युमेंटरी तयार केली, बीबीसीचा खुलासा

March 5, 2015 7:41 PM0 commentsViews:

bbc 405 मार्च : ‘निर्भया’वर तयार करण्यात आलेल्या ‘इंडियाज डॉटर’या डॉक्युमेंटरीमुळे जगभरात एकच खळबळ उडालीये. भारतात याचे तीव्र पडसाद उमटले आहे. मात्र, आम्ही आमच्या ठरवलेल्या संपादकीय धोरणांनुसार डॉक्युमेंटरी प्रसारित केली असं स्पष्टीकरण बीबीसीने दिलंय. निर्भयाच्या कुटुंबियाच्या सहमतीनेच ही डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली असंही बीबीसीने स्पष्ट केलं. लोकांना घटनेचं गाभीर्य कळावं हा त्यामागचा प्रयत्न होता असंही बीबीसीने स्पष्ट केलं.

दिल्लीत 2012 साली झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणावर बीबीसीच्या पत्रकार लेस्ली उड्विन यांनी इंडियाज डॉटर ही डॉक्युमेंटरी तयार केली. ही डॉक्युमेंटर बीबीसीने प्रसारणाच्या एक दिवसाअगोदरच काल रात्री इंग्लंडमध्ये पहाटेच दाखवली. भारतात या डॉक्युमेंटरीवर बंदी घालण्यात आलीये. या डॉक्युमेंटरीवर बीबीसीने आज स्पष्टीकरण दिलंय. डॉक्युमेंटरी आम्ही आमच्या संपादकीय धोरणानुसार तयार केलीये. या प्रकरणाची संवदेनशीलता लक्षात घेऊन पूर्ण जबाबदारी स्वीकारत डॉक्युमेंटरी प्रसारित केलीये. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळेच एका दिवसाअगोदरच ही डॉक्युमेंटरी प्रसारित केलीये असं बीबीसीने स्पष्ट केलं. भारताबाहेरही ही डॉक्युमेंटरी दाखवली जाऊ नये म्हणून भारत सरकारने बीबीसीला पत्रही लिहलं होतं. यावर बीबीसी म्हणते, ही डॉक्युमेंटरी निर्भयाच्या कुटुंबियांच्या सहमतीनेच तयार करण्यात आलीये. ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्यामुळे अशा घटनेचं गांभीर्य लोकांना कळण्यास मदत होईल. या घटनेमुळे भारताला मोठा हादरा बसला होता. देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं झाली होती. महिलांच्या बाबतीत लोकांची मानसिकता बदलावी अशी सगळ्यांची मागणी होती. तोच प्रयत्न आम्ही केलाय असंही बीबीसीचं नमूद केलं.

भारतात बंदी, युट्यूबवरूही डॉक्युमेंटरी हटवली

दरम्यान, बीबीसीविरोधात कायदेशीर कारवाईचा विचार केंद्र सरकार करतंय. बीबीसीच्या पत्रकार लेझ्ली उडवीन यांनीच निर्भयावर बलात्कार करणार्‍या मुकेशकुमारची मुलाखत तिहार तुरुंगाच्या परिसरात घेतली होती. या मुलाखतीमध्ये मुकेश सिंहनं केलेल्या वक्तव्यांनंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या डॉक्युमेंटरीच्या प्रसारणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीच्या मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांकडे तशी माहिती दिली. त्याला कोर्टाने मान्यता दिलीये. बीबीसी आणि इतर भारतीय चॅनेल्सना या निर्णयाची माहिती देण्यात आलीये, तसंच ही डॉक्युमेंटरी इंटरनेटवरही अपलोड करता येणार नाहीये युट्यूबवरूनही डॉक्युमेंटरी हटवण्यात आलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close