उद्धव ठाकरे यांच्यावर सरवणकरांचा सनसनाटी आरोप

September 25, 2009 10:08 AM0 commentsViews: 6

25 सप्टेंबर मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला हा उद्धव ठाकरेंच्याच सांगण्यावरून केला, असा आरोप सेनेचे बंडखोर आणि काँग्रेसचे माहीम मतदारसंघाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी केला आहे. चारच दिवसांपूर्वी सरवणकरांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने सरवणकरांच्या कार्यकर्त्यांनी मनोहर जोशींच्या घरावर हल्ला केला होता. त्यानंतर उमेदवारी मिळाली नाही म्हणुन नाराज सरवरणकरांनी नारायण राणेंच्या उपस्थितीत गुरुवारी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. शुक्रवारी त्यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज भरला. त्यावेळी नारायण राणे यांनी माहीम मतदारसंघात खरी लढत काँग्रेस आणि मनसेत असल्याचं सांगितलं. शिवसेनेला मतदार तिसर्‍या नंबरवर फेकतील असंही राणे यावेळी म्हणाले.

close