‘पुरुषांना काठ्यांचा प्रसाद’

March 5, 2015 10:09 PM0 commentsViews:

05 मार्च : रंगाचा उत्सव साजरा करण्यासाठी होळीच्या दिवसाची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतो, पण बंजारा समाजात तर या होळीचा उत्साह कधीच सुरू झाला आहे. पारंपारिक वेषात आणि डफाच्या तालावर ठेका धरत लमाण भाषेतली गाणी म्हणत नाचत असलेले स्री पुरुष असं दृष्य खेडोपाडी पाहायला मिळतं. यावेळी ‘लेंगी’ गीतं गायली जातात, या लेंगी गाण्यांमध्ये होळीचं वर्णन केलेलं असतं. या उत्सवात स्त्रियांनी पुरुषांना काठीने मारण्याची परंपरा आहे. त्यावेळी स्त्रिया पुरुषांकडून भेट म्हणून पैसे घेतात. होळीच्या दिवसात लेंगी, गेर,धुंड असे अनेक खेळ खेळले जातात. नैसर्गिक रंगांचा वापर करत 7 दिवस बंजारा समाज होळी साजरी करतो. बंजारा समाजात होळी पेटवतात, तीसुद्धा धुलिवंदनाच्या दिवशी सकाळी…होळीच्या या काळात वर्षभरात ज्या मुलांचा जन्म झालाय त्यांचा वाढदिवसही साजरा केला जातो..लोकगीतांमधील आणि लोककथांमधले संदर्भ प्रमाणे मानून सामाजिक, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा प्रयत्न बंजारा समाजातले लेाक करताना दिसतात.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close