…या शाळेत दहावीच्या परीक्षेत शाही लग्नाचं विघ्न !

March 5, 2015 10:24 PM0 commentsViews:

urali schoolहलीमा कुरेशी, पुणे

पिंपरी चिंचवड (05 मार्च ): दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्यातला टर्निंग पॉंईंट, या परीक्षेत पेपर देण विद्यार्थ्यांना दिव्यातून जाण्यासारख वाटत असतं. या परीक्षेच्या केंद्रातच जर शाही लग्न असेल तर विद्यार्थ्यांनी नेमका पेपर द्यायचा कसा ?, असा पेच उरूळी कांचनच्या महात्मा गांधी विद्यालय या परीक्षा केंद्रावर उद्भवणार आहे. कारण इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी येथे बड्या राजकीय पुढार्‍याच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे.

… हे आहे उरळी कांचनमधलं महात्मा गांधी विद्यालय…एकीएकडे दहावीची परीक्षा सुरू असताना…या मैदानात सध्या संस्थेचे विश्वस्त महादेव कांचन यांच्या मुलाच्या शाही विवाह सोहळ्याची तयारी सुरू आहे. या तयारीचा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना त्रास होतोय. पण त्याची कुणालाही फिकीर नाही. 7 मार्चला लग्न आहे. आणि त्यांच दिवशी दहावीचा पेपरही, पण महादेव कांचन हे राष्ट्रवादीचे नेते आणि संस्थेचे विश्‍वस्त त्यामुळे त्यांना अडवणार कोण?

विशेष म्हणजे या शाही सोहळ्यातले पाहुणे म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीस असल्यावर कोण विरोध करणार…या शाळेत अकराशेच्यावर परिक्षार्थी आहेत आणि हा त्रास सहन करुन ते परीक्षा देतायत. विचार करा लग्नाच्या दिवशी काय अवस्था असेलं.

दहावीची परीक्षा असतांना परवानगी दिली कुणी ? परवानगी देतांना विद्यार्थ्यांचा विचार केला नाही का ? विश्वस्त महादेव कांचन यांचा राजकीय दबाव आहे का? महादेव कांचन यांच्या दबामुळे कोणीही विरोध करत नाही का? अधिकार्‍यांवरही राजकीय दबाव आहे का?लोकं एवढे दबावात आहेत की मुख्याध्यापकही आयबीएन-लोकमतशी बोलायला टाळाटाळ करत होते.

हा शाही-विवाह म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशीच खेळण्याचाच प्रकार आहे. किमान या लग्नाला आमंत्रित मोठी नाव तरी विश्वस्तांना समज देणार की तेही विद्यार्थ्यांच्या त्रासाकडे डोळेझाक करणार हे बघावं लागेल. दरम्यान, पोलीस आणि प्रशासनाशी संपर्क केलाय, या ठिकाणी विद्यार्थांना त्रास होणार नाही याची काळजी घेवू , नियमबाह्य काही होत असेल तर कारवाई करणार असं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आश्वासन दिलंय.

आयबीएन-लोकमतचे सवाल

दहावीची परीक्षा असताना परवानगी दिली कुणी ?
परवानगी देताना विद्यार्थ्यांचा विचार केला नाही का ?
विश्वस्त महादेव कांचन यांचा राजकीय दबाव आहे का ?
दबावामुळे कोणीही विरोध करत नाही का ?
अधिकार्‍यांवरही राजकीय दबाव आहे का ?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close