दहावीच्या एटीकेटीला होयकोर्टाची परवानगी

September 25, 2009 10:12 AM0 commentsViews: 3

25 सप्टेंबर अकरावी प्रवेशासाठी एटीकेटी लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई हाय कोर्टाने परवानगी दिली आहे. एटीकेटीच्या निर्णयावर याआधी सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिली होती. पण गुरुवारी संध्याकाळी कोर्टानं सरकारला 11 वी एटीकेटीची अंतिम परवानगी दिली. दहावीत दोन विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीसह अकरावी प्रवेश करण्याची मुभा यंदा प्रथमच राज्य सरकारने दिली. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दाखल केली होती. पण, हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात अभाविप सुप्रीम कोर्टात अपिल करणार आहे. अशी माहिती अभाविपचे मुंबई अध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक यांनी दिली.

close