औरंगाबादमध्ये अपहरणाच्या अफवेतून दोघांचा मृत्यू

March 6, 2015 9:39 AM0 commentsViews:

aurganbad

06 मार्च : मुलांचं अपहरण करणार्‍या टोळीच्या अफवेमुळे औरंगाबादमध्ये दोघांचा बळी गेला आहे. अपहरणाच्या संशयातून झालेल्या मारहाणीत एका गतिमंद व्यक्तीचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे.

मुलं पळवणार्‍या टोळीबद्दल काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे. अपहरणाच्या संशयावरुन टापरगावामध्ये प्रकाश जंगले आणि गतिमंद असलेल्या दत्तात्रय पल्हाळ यांच्यात हाणामारी झाली. हाणामारीमध्ये दोघेही जखमी झाले. वादात उडी घेत गावकर्‍यांनी गतिमंद असलेल्या दत्तात्रयला मारहाण केली. या मारहाणीत दत्तात्रयचा मृत्यू झाला, तर जखमी प्रकाश जंगले याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळं मुले पळवणार्‍या टोळीच्या अफवेमुळं दोघांचा निष्कारण बळी गेला. याप्रकरणी कन्नड पोलीसांनी अज्ञात जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close