कोळीवाड्यात पुन्हा एक गाव एक होळी !

March 6, 2015 2:04 PM0 commentsViews:

06 मार्च : ठाण्यातील सर्वात जुनी आणि पारंपारिक, होळी म्हणजे ठाण्यातील कोळीवाड्यातील होळी…ठाण्यातील पूर्व भागातील कोळीवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात कोळी आणि आगरी बांधव राहतात. 1932 सालापर्यंत या परिसरातील कोळी बांधव एक गाव एक होळी साजरी करायचे परंतु 1932 नंतर काही कारणास्तव अशा प्रकारे होळी साजरी करण्याची पद्धत बंद झाली. आता प्रत्येकजण आपआपल्या परीने होळी साजरी करू लागला, परंतु यावर्षी काही तरुण मंडळी, जुन्या जाणकार लोकांनी पुढाकार घेवून 1932 नंतर पुन्हा एकदा एक गाव एक होळी करण्याचा निर्धार केला. जवळपास 83 वर्षानंतर पुन्हा त्याच पारंपारिक पद्धतीने होळी सण साजरा केला गेलाय. संपूर्ण कोळीवाडा यात सहभागी झाला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close