माहिममध्ये शिवसैनिक आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

September 25, 2009 10:40 AM0 commentsViews: 3

25सप्टेंबर आदेश बांदेकरांचा अर्ज भरल्यानंतर माहीमच्या निवडणूक निर्णय कार्यालयाबाहेर शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार घोषणायुद्ध झालं. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. बांदेकर अर्ज भरून बाहेर येत असतानाच काँग्रेस नेते नारायण राणे तिथं आले. त्यावर उमेदवार बरोबर नसताना राणे तिथं आलेच कसे, हा आचारसंहितेंचा भंग आहे, अस म्हणत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर थोड्याच वेळात सदा सरवणकर काँग्रेसतर्फे अर्ज भरण्यासाठी आले. त्यावेळी त्यांच्या बरोबर राणेंचे समर्थकही होते. त्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यानं तणाव निर्माण झाला. दरम्यान आता माहीम मतदार संघात काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत जाधव यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. सदा सरवणकरांना उमेदवारी दिल्याने ते नाराज होते.

close