आढळराव पाटलांची नारीजी दूर

September 25, 2009 10:43 AM0 commentsViews: 19

25 सप्टेंबर नाराज असलेले शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नाराजी दूर करण्यात सेना नेत्यांना यश आलं आहे. त्यामुळे शिवसेना उमेदवार कल्पना आढळराव आता आंबेगावमधून लढणार आहेत. उमेदवार निश्चित करताना विचारात न घेतल्यामुळे आढळराव नाराज होते. त्यामुळे आपली पत्नी कल्पना आढळराव यांना मिळालेलं आंबेगावमधलं तिकीट रद्द करावं, असं उद्वेगानं, त्यांनी सेना नेत्यांना सांगितलं होतं. मात्र आता त्यांची नाराजी दूर झाल्याने कल्पना आढळराव शिवसेनेकडून निवडणुक लढणार आहेत.

close