चंद्रावर पाणी : इस्त्रोची अधिकृत घोषणा

September 25, 2009 1:26 PM0 commentsViews: 2

25 सप्टेंबर चंद्रावर पाणी सापडल्याची अधिकृत घोषणा इस्त्रोचे अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी केली. चंद्र कोरडा नाही तर चंद्रावर पाणी आहे या गेल्या कित्येक वर्षांच्या समजाला यामुळे दुजोरा मिळाला आहे. चांद्रयान -1 मोहिमेला हे यश चार महिन्यांपूर्वीच मिळालं होतं. नंतर विविध देशांच्या उपग्रहांमार्फत याची पडताळणी करण्यात आली. हे यश मिळवणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. चांद्रयान -1 वर असलेल्या M3 कॅमेर्‍याला पाण्याच्या थर चंद्राच्या पृष्ठभागावर सापडले आहेत. खास पद्धत विकसित करून हे पाणी काढता येईल पण जवळपास 1 टन मातीवर प्रक्रिया केल्यानंतर त्यातून अर्धा लिटर पाणी सापडेल अशी माहिती माधवन नायर यांनी दिली.

close