घुमान संमेलनाचा खर्च पंजाब सरकार उचलणार

March 6, 2015 8:14 PM0 commentsViews:

Sahitya-samelan06 मार्च: घुमानमध्ये होऊ घातलेल्या 88 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा खर्च आता पंजाब सरकार उचलणार आहे अशी घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी केलीये. संमेलनासाठी जेवण आणि मंडपाचा सर्व खर्च पंजाब सरकार करणार असल्याचं बादल यांनी जाहीर केलं. तसंच महाराष्ट्रानं संत नामदेवांची परंपरा पंजाबला दिल्याबद्दल पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

संमेलनासाठी पूर्ण सहकार्य करण्यासाठी घुमान विकास मंडळाची स्थापनाही करण्यात आली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर घुमानमध्ये नामदेवबाबा कॉलेज उभारणार असून 3 एप्रिलला कोनशीला अनावरण करणार असल्याचं बादल यांनी स्पष्ट केलं. पंजाबमध्ये होणार्‍या या संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, उपस्थित राहणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close