पुणे : दहावीची परीक्षा वार्‍यावर, शाळेत लग्नकल्लोळ सुरूच !

March 7, 2015 1:20 PM0 commentsViews:

pune school407 मार्च : दहावीची महत्वाची परीक्षा असताना दहावी-बारावी बोर्डाचे नियम पायदळी तुडवत उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात लग्न व स्वागत समारंभाची तयारी सुरू आहे. आज इंग्रजीचा महत्वाचा पेपर आहे. या लग्नासाठी येणार्‍या गाड्यांचं पार्किंग शाळेच्या मैदानावर करण्यात येतंय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: या लग्नाला हजर राहणार असल्याचं समजतंय. आयबीएन लोकमतने सर्वप्रथम ही बातमी उघडकीस आणली, पण राष्ट्रवादीचे माजी नेते असलेल्या महादेव कांचन यांनी शिक्षण विभागाच्या नियमांनाही न जुमानता याच ठिकाणी सोहळ्याचं आयोजन केलंय.

या प्रकरणी शिक्षण विभागाने शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावली होती. पण, शिक्षण विभागानं मुख्यध्यापकांना मागितलेला खुलासा अद्यापही मिळालेला नाही.

==================================================================================

संबंधित बातम्या

…या शाळेत दहावीच्या परीक्षेत शाही लग्नाचं विघ्न !

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close