पंचगंगा प्रदुषित करणार्‍या 11 कारखान्यांना ठोठावला 85 लाखांचा दंड

March 7, 2015 1:53 PM0 commentsViews:

panchagangaकोल्हापूर (7 मार्च) : पंचगंगा आणि इतर नद्यांच्या प्रदूषण प्रकरणी आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना दणका दिलाय. कोल्हापूर विभागातल्या 11 साखर कारखान्यांना नियंत्रण मंडळानं 85 लाखांचा दंड ठोठावत बँक गँरंटी जप्त केलीय. त्यामुळं साखर कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 तर सांगली जिल्ह्यातल्या एका साखर कारखान्याचा समावेश आहे.

पंचगंगा नदीत अनेक साखर कारखान्यांचे मळीमिश्रीत पाणी सोडले जाते. त्यामुळे जलचरांसोबतच नदीकाठच्या नागरिकांनाही अनेक वेळी दुषित पाणी प्यावं लागतं. याप्रकरणी अनेक संघटनांनी आंदोलनही केली होती. त्यामुळे आता प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारखान्यांचं उत्पादन बंद का करुन नये अशी नोटीसही या कारखान्यांना बजावलीय. दरम्यान, प्रदूषण प्रश्नी उच्च न्यायालयात याचिका दाखल असून सोमवारी या याचिकेबाबत सुनावणी होणार आहे.

कोणत्या साखर कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळानं दणका दिला ?

शिरोळ – दत्त साखर कारखाना
इचलकरंजी – पंचगंगा साखर कारखाना

पन्हाळा – दालमिया साखर कारखाना
करवीर – भोगावती साखर कारखाना

कुडित्रे – कुंभी कासारी साखर कारखाना
गडहिंग्लज – आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना

वारणानगर – कोरे साखर कारखाना
कसबा बावडा – राजाराम साखर कारखाना

गगनबावडा – डी. वाय. पाटील साखर कारखाना
हुपरी – जवाहर साखर कारखाना

सांगली – राजारामबापू साखर कारखाना
 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close