साखर कारखानदारी वाचवण्यासाठी आता सरकारनेच पुढाकार घ्यावा-पवार

March 7, 2015 2:12 PM0 commentsViews:

sharad_pawar_on_bjp07 मार्च : एफआरपीमुळे उसाच्या टनामागे एफआरपीप्रमाणे दर देण्यासाठी 700 रुपये कमी पडत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीये. तसंच यंदाचा हंगाम कठीण असल्यामुळे साखरधंदा अडचणीत आहे. यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणीही पवारांनी केली. पुण्यात आज एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ऊस आणि साखरेचं गणित मांडलं.

साखर उद्योग अडचणीत आहे. यंदा 90 लाख टन साखर शिल्लक राहणार आहे त्यामुळे उत्पादन खर्च आणि किंमत यांचा मेळ बसवणं कठीण जाणार आहे. एकीकडे बाजारात साखरेला उठाव नाही, टेंडर काढूनही व्यापारी माल उचलत नाहीत.

मग साखर उत्पादकांनी काय करायचं ? असा पाढाच शरद पवारांनी मुख्यमंत्र्यासमोर वाचला. तसंच मुख्यमंत्री आणि साखर मंत्र्यांनी यावर मार्ग काढावा अशी अशी मागणी शरद पवारांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या सुचनांचं स्वागत केलंय. मुख्यमंत्र्यांनी या आठवड्यात याबद्दल बैठक बोलावलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close