संतापाचा उद्रेक, कोल्हापुरात एव्हीएच कंपनीची तोडफोड आणि जाळपोळ

March 7, 2015 1:20 PM0 commentsViews:

kolhapur avh07 मार्च : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील ए व्ही एच कंपनी विरोधात आंदोलनाने आज हिंसक वळण घेतलं. संतप्त आंदोलकांनी एव्हीएच कंपनीच्या आवारात घुसून तेथील साहित्याची नासधूस करत जाळपोळ केली. आज केंद्रीय पर्यावरणाची उच्चस्तरिय कमिटी एव्हीएच ची पाहणी करण्यासाठी आली होती. त्यासाठी आंदोलक आपल्या संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी जमले होते.

गेल्या तीन वर्षांपासून स्थानिकांनी एव्हीएच प्रकल्पाला विरोध आहे. चंदगड तालुका हा निसर्ग संपन्न तालुका अशी ओळख असताना  इथं हा प्रदूषणकारी प्रकल्प नको अशी इथल्या जनतेची सातत्यान मागणी आहे. मात्र, याकडे पर्यावरण खात्यान साफ दुर्लक्ष करत 21 जानेवारीला या प्रकल्पाच्या उत्पादनाला परवानगी दिली. उत्पादन सुरू होऊन एक महिना उलटला तोच इथल्या रहिवाशांना अनेक समस्यांना समोर जाव लागतं असल्याचं रहिवास्यांचं म्हणणं आहे. अखेर आज गोष्टीचा उद्रेक होतं आंदोलकांनी हिंसक मार्गाचा अवलंब करत कंपनीची जाळपोळ केली. आतापर्यंत या कंपनीची तीन वेळा जाळपोळ झाली आहे. ही कंपनी अशीच सुरू राहिल्यास आंदोलक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close