तुकोबांचा बीज सोहळा

March 7, 2015 5:25 PM0 commentsViews:

07 मार्च : देहुनगरीत आज जगतगुरू तुकाराम महाराजांचा बीज सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडतोय. आज पहाटे चार वाजल्यापासूनच काकडआरतीने या सोहळ्याला सुरूवात झालीय. तुकाराम बीजेचं हे 367 वं वर्ष आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून 100 हून अधिक  दिंड्या देहू नगरीत डेरेदाखल झाल्यात. वारकर्‍यांमध्ये या सोहळ्याला विशेष महत्व आहे. मुख्य सोहळ्याला दुपारी साडेबाराला सुरूवात होणार आहे. या तुकाराम बीज सोहळ्यासाठी यावर्षी सुरक्षेच्या कडेकोट उपाययोजना करण्यात आल्यात.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close