कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट, कॉपी पुरवण्यासाठी भरली जत्रा

March 7, 2015 8:40 PM0 commentsViews:

washim 10th exam07 मार्च : सध्या राज्यात दहावाची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. राज्यात कॉपीमुक्त परीक्षा व्हावी अशी मोहीम सुरू असल्याचा गवगवा केला जात असला तरी कॉपीबहाद्दरांनी या मोहिमेला हरताळ फासलंय. वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडमध्ये शिवाजी विद्यालय या परीक्षा केंद्रावर कॉपीबहाद्दरांची जणू जत्राच भरली होती. ‘कुंपणचं जेंव्हा शेत खातं’ या म्हणी प्रमाणे पोलिसही बघ्याच्या भूमिकेत दिसून आले.

वाशीम जिल्ह्यातील 22 हजार विद्यार्थी आयुष्याला टर्निंग पाँईट देणारी अर्थात 10 ची परीक्षा देत आहे.यासाठी 76 परीक्षा केंद्र सज्ज आहे. परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी म्हणून 6 भरारी पथकं तैनात करण्यात आलीये. पण बर्‍याच शाळेत खुलेआम कॉपी करत असताना किंवा पुरवतानाचं चित्र आहे. जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कोयाळी बुद्रुक इथल्या शिवाजी हायस्कुलच्या परिसरामध्ये कॉपी पुरविणार्‍या हितचिंतकांची जत्रे प्रमाणे गर्दी पाहवयास मिळालीये. खिडकीवरून चढून पोलीस असो किंवा होमगार्डच्या भीतीविना बिनधास्त कॉपी पुरवण्यात आलीये. मात्र, पोलीस होमगार्ड बघ्याची भूमिकेत होते. एवढंच नाहीतर भरारी पथकांची भीतीही कुणी बाळगत नाही. भरारी पथक तपासणी करून परतल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थेच पाहण्यास मिळालीये. विशेष म्हणजे आज इंग्रजीचा पेपर असल्यामुळे आपला पाल्य अवघड अशा इंग्रजीचा पेपर पास व्हावा यासाठी कॉपी पुरवण्यासाठी पोलीस सुरक्षेचं कडही पालकांनी मोडून काढलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close