पुणे मेट्रो ‘ट्रॅक’वर , पहिला टप्प्याला मंजुरी

March 7, 2015 9:14 PM0 commentsViews:

pune metro 3407 मार्च : पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला एक महिन्यात मंजुरी देऊ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला लागलीच मंजुरी देऊन काम सुरू करणार असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

निगडी ते स्वारगेट मेट्रोचा पहिला टप्प्याचं काम सुरू होणार आहे. तर दुसरा टप्पा वनास ते रामवाडी याबाबत अनेक सूचना आहेत त्यासाठी एक समिती नेमण्यात आलीये. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलीये. याबाबत समितीनं एक महिन्यात अहवाल देणं अपेक्षित आहे. समितीच्या अहवालानंतरच दुसर्‍या टप्प्याला मंजुरी देण्यात येणार आहे. या समितीत डॉ. विजय केळकर, उद्योगपती फिरोदिया, शशिकांत लिमये या तज्ञांचा समावेश असणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close