अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड

September 25, 2009 1:45 PM0 commentsViews: 2

25 सप्टेंबर शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. गुरुवारीच काँग्रसेवासी झालेले सदा सरवणकर यांनी माहीम मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेतर्फे माहिमची जागा लढवणारे आदेश बांदेकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारीच दाखल केला. अमरावतीतल्या दुरंगी लढतीत काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांनीही वाजत गाजत अर्ज भरला. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते. सोलापूरमधून काँग्रेसची उमेदवारी मिळालेल्या प्रणिती शिंदे यांनीही आपला उमेदवारी दाखल केला.

close