अभिनेता आदित्य पांचोलीची जामीन्यावर सुटका

March 8, 2015 5:08 PM0 commentsViews:

apancholi08 मार्च : जुहूमधल्या हॉटेल सी प्रिन्सेसच्या ट्रायोलॉजी पबमध्ये काल (शनिवारी) रात्री बाऊन्सरला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीला कोर्टाने जामीनावर सोडले आहे. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. त्यांना काल रात्री अटक करण्यात आली होती.

पबमध्ये मित्रासोबत गेलेल्या आदित्य पांचोली याने इंग्रजी ऐवजी हिंदी गाणे लावण्यावरुन डिजेसोबत वाद घातला. यावेळी त्याने तिथल्या बाऊन्सरच्या डोक्यात आपला मोबाईल फोन मारला. यामध्ये पबच्या बाऊन्सरच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याला पाच टाके पडले. पबची तोडफोड आणि मारहाण केल्याप्रकरणी आदित्य पांचोलीवर सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी आदित्य पांचोलीला आज कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्याला जामीन देण्यात आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close