2010 च्या दगडफेकीचा मास्टरमाईंड मसरत आलम तुरुंगाबाहेर

March 8, 2015 1:28 PM0 commentsViews:

Masarat-Alam1

08  मार्च : भाजपचा विरोध झुगारून सर्व राजकीय कैद्यांना तुरुंगातून सोडून देण्याच्या राज्याचे मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्या सूचनेच्या पाश्‍र्वभूमीवर पोलिसांनी आज कट्टर फुटीरतावादी नेता मसरत आलम याची तुरुंगातून सुटका केली. मसरत आलम हा मुस्लीम लीगचा नेता असून बारामुल्लाच्या जेलमध्ये होता. मसरतला सोडण्याचा मुफ्ती सरकारचा हा पहिला एकतर्फी राजकीय निर्णय आहे. पीडीपीच्या वादग्रस्त निर्णयामुळे भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

हुरियतचा नेता आणि जहाल दहशतवादी असलेल्या मसरत आलमवर देशाविरोधात युद्ध पुकारणे, दहशतवादी कारवाया करणे याच्यासह एक डझनहून जास्त गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक करण्यासाठी सरकारने 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अशा या दहशतवाद्याला तुरुंगातून मुक्त करण्याचे आदेश काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती यांनी दिले.

जम्मू-काश्मीरमध्ये 2008 आणि 2010 मध्ये दगडफेक आंदोलनाचे आलमने नेतृत्व केले होते. त्याच्या हिंसक आंदोलनांमध्ये 120 जण मृत्युमुखी, तर हजारो जण जखमी झाले होते. त्याच्या देशविरोधी कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू झाल्यावर तो भूमिगत झाला होता. त्याला 2010 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याआधी भूमिगत असताना तो “सीमेपलीकडील’ लोकांच्या संपर्कात होता.

मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी दिलेल्या राजकीय कैद्यांच्या सुटकेच्या आदेशानुसार मसरतची सुटका झाली. यावर ‘पंतप्रधान मोदी 56 इंची छातीची फुशारकी मारत फिरत होते, आता उंदीर होऊन बसले आहेत’, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close