गुगल डूडल मधून स्त्रीशक्तीला सलाम

March 8, 2015 3:06 PM0 commentsViews:

ã¦ü¦ãüŸÖÖ Ë¦ü¦ËüŸÖÖ

08 मार्च :  जागतिक महिला दिनानिमित्त आज जगभरात विविध कार्यक्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणार्‍या महिलांचा सन्मान होत असतो. गुगलने दरवर्षी प्रमाणे यंदाही आपल्या होमपेजवरील डूडलच्या माध्यमातून महिलांना ‘जागतिक महिला दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. मग ते अंतराळ विज्ञान असो किंवा मेडिकल असो किंवा कला क्षेत्र असो. सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. या महिला शक्तीला गुगलने डुडलच्या माध्यामातून सलाम केला आहे.

थोडक्यात, जगाच्या पाठीवर कुठल्याच क्षेत्रात महिला मागे नाहीत, हा संदेश गुगल डूडलने दिला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close