ज्येष्ठ पत्रकार विनोद मेहता यांचे निधन

March 8, 2015 5:53 PM0 commentsViews:

vinod mehta
08 मार्च :  ज्येष्ठ पत्रकार आणि आउटलूक मासिकाचे संपादक विनोद मेहता यांचे आज निधन झाले. मेहता 73 वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. अनेक अवयव निकामी झाले होते. अखेर आज सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

‘इंडिया टुडे’तून पत्रकारीतेची सुरूवात करणार्‍या मेहता यांनी ‘द पायोनियर’, ‘संडे ऑब्जर्बर’, ‘द इंडिपेंडेन्ट’ आणि ‘आऊटलूक’ या वृत्तपत्रे आणि मासिकांच्या संपादकपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली होती. 60 ते 90 या कालावधीत त्यांची कारकीर्द बहरली. मेहता हे त्यांच्या बिनधास्त आणि बेधडक मतांसाठी ओळखले जात होते. भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये विनोद मेहता यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी अनेक पुस्तक लिहिली. `लखनौ बॉय` हे त्यांचं आत्मचरित्र खूप गाजलं होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेहतांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच पत्रकारितेचे मोठे नुकसान झाले आहे, अशी भावना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अनुपम खेर, सोनिया गांधी यांनी ट्विटरवरुन मेहतांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close