मुलींसाठी राज्यात ‘भाग्यश्री’ योजनेचा शुभारंभ

March 8, 2015 6:59 PM0 commentsViews:

Beti bacho beti padhao in maharashtra

08 मार्च : केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात ‘भाग्यश्री’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसंच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी वाढीव मानधन लागू करण्याबाबत घोषणा करण्यात आली. आघाडी सरकारने सुरू केलेल्या ‘सुकन्या योजने’मध्ये बदल करुन सुधारित ‘भाग्यश्री सुकन्या योजने’ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यात एकुलती एक मुलगी असेल आणि जर मुलीच्या आईने तिच्या जन्माच्यावेळी अंतिम कुटुंब नियोजन केलं असेल तर मुलीचा जन्म साजरा करण्यासाठी 5 हजार रुपये, तसचं मुलगी 5 वर्षांची होईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी दर्जेदार पोषण देण्याकरता प्रतिवर्ष 2 हजार प्रमाणे 5 वर्षांत 10 हजार रुपये, मुलीच्या प्राथमिक शिक्षणासाठी प्रतिवर्ष 2.5 हजार प्रमाणे 4 वर्षांकरता 10 हजार, मुलीच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रतिवर्ष 3 हजार रुपये या प्रमाणे 8 वर्षांकरता 24 हजार रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे.

योजनेच्या दुसर्‍या प्रकारात मुलगी एकुलती एक आहे आणि तिच्या आईने दुसर्‍या मुलानंतर अंतिम कुटुंब नियोजनाची हमी दिल्यास किंवा दुसर्‍यांदा मुलगी जन्मल्यास आणि अंतिम कुटंब नियोजन केल्यास जन्माच्या वेळी 2.5 हजार रुपये, मुलगी 5 वर्षांची होईपर्यंत प्रतिवर्ष 1 एक हजार रुपये प्रमाणे 5 हजार रुपये. मुलीच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रतिवर्ष 2 हजार रुपयेप्रमाणे 16 हजार रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं अभिनेत्री भाग्यश्रीने म्हटलं आहे. भाग्यश्री या योजनेची ब्रान्ड ऍम्बेसेडर आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close