मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर चप्पल फेकल्याप्रकरणी चिखलीकरांच्या 150 समर्थकांवर गुन्हे दाखल

September 26, 2009 9:39 AM0 commentsViews: 6

26 सप्टेंबर मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर चप्पलफेक प्रकरणी आमदार प्रताप पाटील-चिखलीकरांच्या दीडशे सर्म्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात मुख्यमंत्री उमेदवारी अर्ज भरायला गेले असताना त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर चिखलीकर समर्थकांनी चप्पल फेकली होती. यावेळी दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती.

close