मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

March 8, 2015 8:37 PM0 commentsViews:

08 मार्च :  राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होतं असलं तरी विरोधकांचा पवित्रा बघता हे अधिवेशन चांगलंच गाजणार अशी चिन्हं आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.

राज्यात सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या, दुष्काळाबाबत सरकारची उदासीनता, कॉ.गोविंद पानसरे यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यात आलेलं अपयश या मुद्यांवर अपयशी ठरलेल्या सरकारच्या चहापानाला न जाण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटिल आणि धंनजय मुंडे यांनी जाहिर केलं आहे. तर विरोधकांकडे मुद्देच नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

यापूर्वी 15 वर्ष सर्व प्रश्न चर्चेतून सुटतात, त्यामुळे विरोधकांनी चहापाण्यावर बहिष्कार टाकू नये, असं म्हणणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आता युती सरकार आल्यावर मात्र घूमजाव केलं, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. मुस्लिमांना आरक्षण देण्यात सरकारने केलेली टाळाटाळ,मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारचा वेळकाढूपणा या मुद्यांवर अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असल्याचं विखे-पाटिल यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close