… नाहीतर देशभरात जेलभरो आंदोलन करू – अण्णा हजारे

March 9, 2015 11:42 AM0 commentsViews:

09 मार्च :   केंद्र सरकारने भूसंपादन विधेयक मागे घ्यावा, नाहीतर देशभरात जेलभरो आंदोलन करू, असा इशारा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. अण्णा आज (सोमवारी) सेवाग्राममध्ये बापूंच्या आश्रमात देशभरातल्या पन्नास शेतकरी नेत्यांसोबत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक घेत आहेत.

भूसंपादन विधेयकाविरोधात अण्णा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सेवाग्राम ते दिल्ली अशी पदयात्रा काढणार आहेत. या पदयात्रेची तारीखही उद्या जाहीर केली जाईल. या विधेयकात सुधारणा करायच्या असेल तर अध्यादेश पूर्णपणे मागे घ्यावा, अशी मागणी अण्णांनी केलीय. त्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही, असा इशारा अण्णांनी दिला आहे. आज वर्धामध्ये होणार्‍या बैठकीसाठी ‘आप’चे नेते योगेंद्र यादव, मेधा पाटकर, राजेंद्र सिंह हे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close