प्रवीण दरेकरांचा अर्ज वैध

September 26, 2009 9:45 AM0 commentsViews: 5

26 सप्टेंबर मनसेचे मागाठण्याचे उमेदवार प्रवीण दरेकर यांचा अर्ज शनिवारी छाननीसाठी स्थगित ठेवण्यात आला होता. शिवसेनेचे संजय घाडी यांनी दरेकर यांच्या अर्जावर आक्षेप घेतल्यानं हा अर्ज स्थगित ठेवण्यात आला होता. मात्र घाडी यांना त्यांनी घेतलेल्या आक्षेपावर योग्य ते स्पष्टीकरण देता आलं नाही, त्यामुळे दरेकर यांचा अर्ज निवडणूक अधिकार्‍यांनी वैध ठरवला. दरेकर यांच्या एका सहकारी संस्थेबद्दलची अर्जातली माहिती खोटी असल्याचं पत्र घाडी यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलं होतं. त्यावर आयोगानं दरेकर यांच्याकडे एका तासात स्पष्टीकरण मागितलं होतं, त्याचबरोबर संजय घाडी यांनाही पुरावे देण्यास सांगण्यात आलं होतं. दरम्यान, शिवसेनेनं हे राजकीय सूडापोटी केलं असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

close