विधानसभा निवडणुकीसाठी 10 हजार 643 उमेदवारी अर्ज दाखल

September 26, 2009 9:50 AM0 commentsViews: 3

26 सप्टेंबर विधानसभा निवडणुकीत विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 288 जागांसाठी एकूण 7 हजार 199 जणांनी 10 हजार 643 उमेदवारी अर्ज दाखल केलेत. विशेष म्हणजे एवढ्या उमेदवारांमध्ये फक्त 419 महिलांचा समावेश आहे. जालना, औरंगाबाद पूर्व आणि श्रीरामपूर या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 61 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. तर डहाणू मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे 10 उमेदवारांनी फॉर्म भरलेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या 2 दिवसात 5 हजार 400 उमेदवारी अर्ज दाखल झाले. मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या तुलनेत ही वाढ 100 टक्के असल्याचं निवडणूक आयोगाच्या नोंदीवरून स्पष्ट होतं. 29 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

close