राजेंद्र गवई काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत दाखल

September 26, 2009 1:00 PM0 commentsViews: 3

26 सप्टेंबर तिसर्‍या आघाडीला रामराम केलेले रिपब्लिकन पक्षाचे गवई गटाचे नेते राजेंद्र गवई काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सामील झाले आहेत. शनिवारी त्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळी कृपाशंकर सिंह आणि माणिकराव ठाकरे हेही उपस्थित होते. गवई काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सामील झाल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तिसर्‍या आघाडीत वैचारिक गोंधळ असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गवई हे रामदास आठवलेंवर नाराज होते. तसेच तिसर्‍या आघाडीतल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्याच्या मुद्दयावरून ते आघाडीतून बाहेर पडले होते. गवई गटाला डोंबिवली आणि दर्यापूर या दोन जागा सोडण्यात आल्या आहेत.

close