भूसंपादन विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू

March 9, 2015 4:19 PM0 commentsViews:

farmer38009 मार्च : भूसंपादन विधेयकावरुन झालेली कोंडी फोडण्यासाठी आता मोदी सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भूसंपादन विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी सरकारने आणलेला अध्यादेश आणि विधेयक दोन्हीही शेतकर्‍यांच्या जमिनी खाजगी उद्योजकांच्या हाती देण्याचा डाव आहे, असं मत विरोधकांनी मंडलं आहे.

भूसंपादन विधेयकाबाबत विरोधकांची मनं वळवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. लोकसभेत या विधेयकाच्या चर्चेसाठी 8 तास देण्यात आले असून ही चर्चा उद्याही सुरू राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंह, यांच्यासह मुख्तार अब्बास नक्वी, शरद पवार, डेरेक ओ ब्रायन, डी. राजा आणि इतर नेत्यांनीही या बैठकीला हजेरी लावली. संसद भवनात व्यंकय्या नायडूंच्या ऑफिसमध्ये ही बैठक पार पडली.

सरकारने अध्यादेश काढून 2013 साली बनलेल्या भूसंपादन कायद्यात बदल केले आहेत. त्याला काँग्रेस, ममता बॅनजीर्ंची तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, आणि डाव्या पक्षांनी विरोध दर्शवला आहे. कोणताही बदल आम्हाला मंजूर नसल्याचं सांगत काँग्रेसनं या विधेयकाला विरोध कायम ठेवला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही या विधेयकाला विरोध केला आहे. इतकंच नाही तर एनडीएचे घटकपक्ष असणार्‍या शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे पक्ष सुद्धा विधेयकाच्या विरोधात आहेत. त्यामुळेच विरोधकांना खटकणार्‍या काही तरतुदी बदलण्याची तयारीही सरकारनं दाखवली आहे. त्यामुळे या बैठकीनंतर आता भूसंपादन विधेयकाचं पुढचं भवितव्य काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close