इंग्लंड वर्ल्डकपमधून बाहेर, बांगलादेश क्वार्टर फायनलमध्ये

March 9, 2015 7:43 PM0 commentsViews:

eng vs ban09 मार्च : आज वर्ल्डकपमध्ये धक्कादायक निकालामुळे सगळ्यांच्या भूवय्या उंचावल्यात. ज्या देशात क्रिकेटचा जन्म झाला त्या इंग्लंडला वर्ल्डकपमधून बाहेर पडावं लागलंय. बांगलादेशनं इंग्लंडचा दणदणीत पराभव केलाय. या विजयाबरोबर बांगलादेशनं क्वार्टर फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय तर इंग्लंडचं या वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलंय.

टॉस जिंकून इंग्लंडनं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. सौम्या सरकार, महमदुल्लाह आणि मुशफिकार रहिमच्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशनं इंग्लंडसमोर 276 रन्सचं टार्गेट उभारलं. महमदुल्लाहनं शानदार फटकेबाजी करत 103 रन्स केले. पण इंग्लंडची बॅटिंग आज पूर्णपणे ढेपाळली. ईयन बेलनं 63, बटलरनं 65 आणि वोक्सनं 42 रन्स करत इंग्लंडला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यात त्यांना यश मिळालं नाही आणि अखेर बांगलादेशनं क्वार्टरफायनलमध्ये धडक मारलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close