उदंड झाले बंडोबा

September 26, 2009 1:52 PM0 commentsViews: 11

26 सप्टेंबर विधासभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांना बंडखोरीचा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांची खरी लढत स्वत:च्याच पक्षातल्या उमेदवारांविरोधात आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक बंडखोरी राष्ट्रवादीत झाली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या राहुल आहेरांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर सुधाकर बडगुजर आहेत. राष्ट्रवादीच्या नाना महालेंच्या विरोधात काँग्रेसचे दशरथ पाटील आहेत. नाशिक पूर्वमध्ये काँग्रेसचे राजाराम पानगव्हाणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे देविदास पिंगळे आणि राष्ट्रवादीचेच दिनकर आढाव आहेत. तर नाशिक मध्यमध्ये काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्या विरोधात काँग्रेसचे शैलेश कुटे यांनी बंडखोरी केली आहे. शेवगावमध्ये राष्ट्रवादीचे चंद्रकांत घुले यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बंडखोर राजीव राजाळे यांनी. तर शिर्डीतून काँग्रेसच्या राधाकृष्ण विखेपाटलांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बंडखोर राजेंद्र पिपाडा सेनेतर्फे उभे आहेत. जळगाव जिल्ह्यातही बंडखोरीची साथ सगळ्यांच राजकीय पक्षांत जोरदार पसरली आहे. भाजपच्या डॉ.बी.एस.पाटील यांनी अनिल पाटील यांना उमेदवारी दिल्यानं अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तर विद्यमान आमदार अरुण पाटील याना उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी रावेर विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरला आहे. काँग्रेसच्या शिरीष चौधरी यांना तिकीट नाकारल्यानं त्यांनी रावेर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

close