पैसा नाही म्हणून शिवसेनेने केली उमेदवारी रद्द

September 28, 2009 9:44 AM0 commentsViews:

28 सप्टेंबर पैसा नाही म्हणून उमेदवारी रद्द केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा मतदारसंघात घडली आहे. सभा भरवण्यासाठी पैसा नाही. म्हणून शिवसेनेने आधी जाहीर केलेली अरूण पाटील नवल्यांची उमेदवारी रद्द केली आहे. त्याबदल्यात बंडखोर उमेदवार नीळकंठ कुंडे यांना पाठिंबा दिला आहे. आपल्याला उमेदवारी मिळाली नसल्यानं निळकंठ कुंडे यांनी शिवसेनेच्या नेत्यांचा पुतळा जाळला होता. इतकंच नाही तर शिवसेनेच्या राजुरामधल्या कार्यालयाला त्यांनी टाळंही ठोकलं होतं.

close