कणकवलीत राष्ट्रवादी आणि राणे समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी

September 28, 2009 9:52 AM0 commentsViews: 5

28 सप्टेंबर कणकवलीत रविवारी रात्री राष्ट्रवादी आणि राणे समर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही पक्षाच्या 24 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ऐन निवडणुकीच्या कालावधीत कणकवलीत हे प्रकार पुन्हा एकदा सुरु झाल्याने कणकवलीतला तणाव वाढला आहे. कणकवलीत पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून राज्य राखीव पोलिस दलाची 1 तुकडी आणि विशेष सुरक्षा बलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आला आहेत. कणकवलीत सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

close