राज्यात 500 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त

March 10, 2015 9:15 AM0 commentsViews:

Drugs new

10  मार्च :  उर्से टोलनाका येथे एका एका स्विफ्ट कारवर, तसेच इस्लामपूर आणि सातार्‍याजवळच्या कारखान्यांवर छापा घालून महसूल गुप्तचर संचलनालय आणि पुणे कस्टम विभाग यांनी सोमवारी अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत  500 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 11 संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

तळेगावजवळ ‘एक्स्प्रेस वे’वरील उर्से टोलनाक्यावर इस्लामपूरहून मुंबईला एका स्विफ्ट कारमधून नेण्यात येत असलेले 50 किलो ‘मेफेड्रोन’ड्रग्ज जप्त केले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एमडी ड्रग्जसह इतर अति उत्तेजक ड्रग्जची तस्करी करणार्‍या ओंकार इंडस्ट्रीजच्या नासिर सांगलीसह 5 जण ताब्यात घेतलं आहे. कारमधून 3 कोटी रुपये किमतीचे 50 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्यानंतर जिथे ड्रग बनवण्यात आले, त्या कंपनीवर छापा टाकून तब्बल साडेतीनशे किलो ड्रग जप्त करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मुंबई इथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सातार्‍याच्या खंडाळा तालुक्यातील कान्हेरी गावातून तब्बल 112 किलो मेफी ड्रोम हा अमलीपदार्थांचा साठा जप्त केला आहे. या अमलीपदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 22 कोटी असून याप्रकरणी 2 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही राज्यातील मोठी कारवाई असून एवढ्या मोठ्या प्रमाणत एका छोट्याशा खेडेगावात हा साठा लपवण्यात आला होता. ही गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं संशयित आरोपींना अटक केली आहे. हा साठा 5 मोठ्या पिशव्यांमध्ये लपवण्यात आल्या होता. ही माहिती मिळाल्यानंतर मोठ्या शिताफीने सातारा लोकल क्राईम ब्रांचने छापा टाकून हा साठा जप्त केला आहे. त्याचबरोबर 2 संशयितांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपी पैकी 1 आरोपी हा मुंबई येथे पोलिस असल्याची माहिती समोर आली आहे मात्र सातारा पोलिसांनी या बाबत कमालीची गुप्तता पाळली आहे .

हे ड्रग्ज कुणी आणले, कुठे घेऊन जात होते, याबाबत पोलीस तपास करत आहेत. शिवाय ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close