माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचं निधन

March 10, 2015 8:49 AM0 commentsViews:

mandlik10 मार्च :  कोल्हापूरचे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचं मंगळवारी मुंबईत हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मंडलिक यांचं पार्थिव आता कोल्हापूरात नेण्यात आलं असून त्यानंतर कागल तालुक्यातील मुरगुड इथे त्यांच्या मुळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सदाशिवराव मंडलिक यांचा जन्म 7 आक्टोंबर 1934 रोजी झाला होता. सदाशिवराव मंडलिक आधी राष्ट्रवादीत होते. पण नंतर ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर विरोधक झाले. कागल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते चार वेळा मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. त्यांना राज्याचे राज्यमंत्री म्हणुनही काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर ते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातुन सलग तीन वेळा निवडूनही आले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close