धर्माशा कोरेंचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

September 28, 2009 9:56 AM0 commentsViews: 2

28 सप्टेंबर अक्कलकोटमध्ये गोळीबारात ठार झालेल्या धर्माशा कोरेंचा मृतदेह ताब्यात घ्यायला नातेवाईकांनी नकार दिला आहे. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. या गोळीबार प्रकरणी निवडणूक आयोगानं 2 विशेष निरीक्षक पाठवण्याचाही निर्णय घेतला आहे. या प्रकरणी भाजपनंही अक्कलकोटमधून मोर्चाही काढला होता. सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातील शेगाव इथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या सभेत गोळीबार केला होता. त्यात 1जण ठार तर 3 जण जखमी झाले होते.

close