मुबलक वीज-पाणी आणि स्वस्त धान्य : युतीचा वचननामा

September 28, 2009 11:11 AM0 commentsViews: 5

28 सप्टेंबर शिवसेना-भाजप युतीचा वचननामा शुक्रवारी मुंबईत जाहीर झाला. सत्तेत आलो तर लोकांना मुबलक पाणी, स्वस्त अन्नधान्य तसंच दोन वर्षांत लोडशेडिंगपासून मुक्तता, असं वचन त्यांनी दिलं आहे. सोबतच मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवू, बचतगटातील 65 वर्षावरील महिलांना पाचशे रुपये पेन्शन, मुंबई – पुणे एक्सप्रेस वे प्रमाणे नाशिक पुणे, नाशिक औरंगाबाद- नागपूर, मुंबई – कोकण एक्सप्रेस वे करण्याचं वचन यावेळी उध्दव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडेंनी दिलं.

close