पाथर्डीमध्ये दहावीचा बीजगणिताचा पेपर फुटला

March 10, 2015 5:07 PM2 commentsViews:

10th exma310 मार्च : राज्यभरात दहावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून प्रयत्न सुरू असले तरी या मोहिमेला हरताळ फासले जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात दहावीचा बीजगणिताचा पेपर अर्ध्या तासात फुटला.

शिक्षक आणि पोलीस यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात कॉपीही होत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. एवढंच नाहीतर कॉपीसाठी व्हॉटसऍपचाही वापर करण्यात येतोय. विद्यार्थ्यांना पेपर व्हॉटसऍपवरून शेअर केले जात आहे.

तर दुसरीकडे कन्नड इथं कॉपी तयार करताना केंद्र प्रमुखालाच रंगेहात पकडलं गेलंय. ज्ञानेश्वर मेस्त्री असं केंद्र प्रमुखाचं नाव आहे. केंद्र प्रमुखासह 3 शिक्षकांनाही ताब्यात घेण्यात आलंय.

(संग्रहित छायाचित्र)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • tejas gagare

    अहो राज्यासाठी हा प्रकार नवीन असेन … … परंतू पाथर्डी मध्ये गेल्या ५ वर्षापासून हा प्रकार सुरु आहे. विशेषत श्री तीलोक जैन विद्यालय तसेच जवळच असणारे मोहटादेवी येथील रेणुका विद्यालय मोहटे हि परिक्षा केंद्रे तर शिक्षकांनीच गैरप्रकार सुरु केलेली केंद्रे आहेत. ते पण स्वताच्या मुलांसाठी .

    तुम्ही चांगला प्रयत्न केला आहे पण पाठपुरावा हवा. मी आव्हान देतो कि साधे इतिहासाच्या पेपर असताना पण तुम्ही मोहटा केंद्र येथे भेट द्या नक्कीच १० ते १५ पोती पुस्तकाची भेटतील मुलांकडून कॉफी करून लिहित असताना …

  • sachin khade

    मोहटे म्हणजे परीक्षा नाहीच ………। घरात बसून केलेला गृहपाठ (होमवर्क )

close