शाहरूखला रॅम्पचा दंड भरण्यासाठी 2 दिवसांची मुदत अन्यथा कारवाई

March 10, 2015 5:25 PM0 commentsViews:

srk mannat10 मार्च : अभिनेता शाहरूख खानला अनधिकृत रॅम्प प्रकरणी दंड भरण्यासाठी आता अवघ्या दोन दिवसांचा कालावधी दिलाय. 12 मार्च ही दंड भरण्याची शेवटची तारीख आहे. या दोन दिवसांत दंडाचे पैसे भरले नाही तर त्याला पुढच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. त्याला मुंबई महापालिकेनं 1 लाख 93 हजारांचा दंड ठोठावलाय.

गेल्या महिन्यात पालिकेनं शाहरुखच्या वांद्र्यातील मन्नत बंगल्याबाहेरचा अनधिकृत रॅम्प तोडला होता. त्याचा खर्च पालिका शाहरूख खानकडून वसूल करणार आहे. त्यासाठी दंड म्हणून शाहरूखनं 1 लाख 93 हजार रूपये भरावे अशी नोटीस महापालिकेनं बजावली आहे. व्हॅनिटी व्हॅन उभी करण्यासाठी शाहरूखनं हा रॅम्प उभारला होता. याबाबत खासदार पुनम महाजन यांनी पालिकेला पत्र लिहलं होतं त्यानंतर पालिकेनं ही कारवाई केली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close